
मे महिन्यात झालेल्या पावसाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्डस मोडत नवा उच्चांक केला.
यंदाच्या मे महिन्यात झालेल्या पावसाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्डस मोडत नवा उच्चांक केला आहे. सर्वसाधारणपणे मे महिन्यात १ ते १८ मेदरम्यान ११३ मिमि इतका पाऊस होतो. यंदा मात्र १४९.७ मिमि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या १२२५ टक्के अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. यापूर्वी १९१८ सालच्या मे महिन्यात ११३.६ मिमि इतका सर्वोच्च पाऊस झाला होता. मात्र हा उच्चांक यंदाच्या मे महिन्यातील पावसाने मोडला आहे.मार्च ते मे हे तीन महिने उन्हाळा हंगामाचे मानले जातात. यंदा मात्र अनेक हवामान प्रणालींमुळे मे महिन्यातच पावसाने झोडपून काढले असून, मान्सून महिन्यात पडणार्या पावसाइतका किंबहुना त्यापेक्षा जास्त या महिन्यात होत आहे. तुरळक २ ते ४ दिवस वगळता राज्यभर पावसाचा मारा अद्यापही सुरूच आहे. यामुळे मे महिन्याची सरासरी फारच मागे टाकत आता या महिन्यातील पावसाने उच्चांकी संख्या नोंदवली आहे.www.konkantoday.com