भूमीगत वीजवाहिनीसाठी खोदलेल्या साईडपट्ट्या व्यवस्थित न बुजवल्याने वाहतुकीला ठरताहेत धोकादायक.

राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत बांधलेल्या रस्ताकामात भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यासाठी खोदलेली साईडपट्टी व्यवस्थित बुजवली न गेल्याने रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. यामुळे चांगल्या रस्त्याचीही दुरवस्था झाली असून काही वाहने या चरात अडकण्याच्या घटना होत आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि पादचार्‍यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान हे काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराला पावसाळ्यात रस्त्याला होणार्‍या धोक्याची सुचना वारंवार देण्यात आली होती. मात्र त्याने त्याने दुर्लक्ष केले. तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकार्‍यांकडेही वारंवार तक्रारी करूनही त्यांनी या कामाकडे कानाडोळा केल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.देवाचे गोठवणे येथील सामाजिक कार्यकर्ते संजय नाटेकर यांनी या बेजबाबदार कामांकडे वाहनचालकांना होणारा त्रास आणि नुकसानीबाबत संबंधित अधिकार्‍यांकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे म्हटले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button