
जिल्हा परिषदेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी.
रत्नागिरी : जिल्हा परिषदमधील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज (२८ मे) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) विजयसिंह जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, कार्यकारी अभियंता तुषार बोरसे यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.