अनिल कानविंदे स्मृती स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघाची निवड१९ वर्षे वयोगटात श्रीहास नारकर व निधी मुळ्ये प्रथम१३ वर्षे वयोगटात आयुष रायकर व तनया आंब्रे प्रथम.

रत्नागिरी : कै. अनिल कानविंदे स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा २०२५ नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. विविध गटांतील खेळाडूंनी आपली चमकदार कामगिरी सादर करत रोख रक्कम व चषक मिळवले. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून फिडे मानांकन प्राप्त खेळाडूंचे पालक प्रतिनिधी व यशस्वी उद्योजिका म्हणून सौ. रुपाली प्रभुदेसाई आणि सौ. वेदिका मुळ्ये उपस्थित होत्या. राज्य निवड स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेत निवड होणाऱ्या रत्नागीरी जिल्ह्याच्या खेळाडूस सौ. मुळ्ये यांनी विशेष पारितोषिक जाहीर केले. खेळाडूंनी जास्तीत जास्त स्पर्धा खेळाव्यात, स्पर्धा हेच आपल्या खेळाचा कस तपासण्याचे उत्तम माध्यम आहे असे सौ. प्रभुदेसाई यांनी सांगितले व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.१९ वर्षाखालील जिल्हा संघ : विजेते श्रीहास नारकर ( चिपळूण ) , आर्यन धुळप, कौस्तुभ हर्डीकर, लवेश पावसकर१९ वर्षाखालील मुलींचा जिल्हा संघ : निधी मुळ्ये, सई प्रभुदेसाई, सानवी दामले, खुशी सावंतउत्तेजनार्थ बक्षीसे : अन्वय अंबिके, वेद डोईफोडे, लोकजित मुळ्ये१३ वर्षाखालील जिल्हा संघ : आयुष रायकर, रुमीन वस्ता१३ वर्षाखालील मुलींचा जिल्हा संघ : तनया आंब्रे, रमा कानविंदेउत्तेजनार्थ बक्षीसे : राघव पाध्ये, अर्णव गावखडकरया स्पर्धेद्वारे जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळाडूंना एक व्यासपीठ मिळाले असून, पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आयोजकांनी यशस्वी स्पर्धेसाठी सर्व खेळाडू व पालकांचे आभार मानले. सदर स्पर्धातून निवड झालेले खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व राज्य निवड स्पर्धेत करतील. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कानविंदे कुटुंबीय, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, शिर्के प्रशालेचे कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विवेक सोहनी व चैतन्य भिडे यांनी पंच म्हणून काम पहिले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button