
निती आयोग भारत सरकार मुंबई जिल्हा कार्यकारी प्रभारी शशिकांतजी सुर्वे यांची शृंगारतळी येथील मनसेच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट मनसेचे उप जिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी केले जंगी स्वागत
आबलोली : राष्ट्रीय लोक तक्रार निवारण आयोग संलग्न निती आयोग भारत सरकार मुंबई जिल्हा कार्यकारी प्रभारी शशिकांतजी सुर्वे यांनी गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयाला नुकतीच सदिच्छा भेट दिली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी शशिकांतजी सुर्वे यांचे शाल घालून पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केले यावेळी पत्रकार संदेश कदम, पत्रकार गणेश कीर्वे, दापोलीचे संजय बारसे आणि महाराष्ट्र सैनिक राहूल जाधव आदी. उपस्थित होते. यावेळी शशिकांतजी सुर्वे यांनी मनसेच्या संपर्क कार्यालयाची आणि राजसाहेबांची भरभरुन स्तुती करुन गरीब जनतेची कामे करा असा संदेश दिला