
मुंबई – गोवा महामार्गाची संगमेश्वर पट्ट्यात वाताहात, कंत्राटदार व अधिकार्यांकडून दुर्लक्ष.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १६ वर्षे सुरू असताना संगमेश्वरच्या नशिबी या कामाच्या दुर्दैवाचे फेरे संपता संपत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदार संगमेश्वरवासियांचा अंत पाहत असल्याची संतप्त प्रतिक्रिया वाहन चालक, प्रवासी आणि ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान संगमेश्वर बसस्थानकासमोर राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदाराने नियमबाह्यपणे एकेरी वाहतूक सुरू करून वाहनचालकांच्या नशिबी दोन महिने वाहतूक कोंडीचा त्रास निर्माण करून ठेवला आहे. कसबा व रत्नागिरीच्या दिशेने दररोज दान किलोमीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा लागत असल्याने वाहनचालक आणि प्रवासी कमालीचे संतप्त झाले आहेत.www.konkantoday.com