
अनेक अडचणी येत असल्याने ग्रामीण भागात अकरावी प्रवेश ऑफलाई करण्याची मागणी.
सध्या राज्यात ११ धी चे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खर तर १९ मे पासून राज्यात ऑनलाईन प्रणाली मार्फत प्रवेश प्रक्रियेला प्रारंभझाला. मात्र ग्रामीण भागात असलेली इंटरनेटच्या अडचणी आणि ऑनलाईन प्रणालीतील ढीगभर भरणा करावयाची माहिती यामुळे विद्यार्थी व पालक सध्या संभ्रमावस्थेत आहेत. यामुळे प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी आणि पालक करत आहेत.विद्यार्थ्यांचा वैयक्तिक इमेल आयडी, जातीचा दाखला, पूर्वी शिकत असलेल्या शाळेचा यु डायस नंबर, ऑनलाइन निकालाची प्रिंट अशा अनेक गोष्टी जमवल्यावर असलेला इंटरनेट चा अभाव यामुळे ग्रामीण आगात विद्यार्थी व पालक पुरते मेताकुटीला आले आहेत.www.konkantoday.com