राजेंद्र माने अभियांत्रिकीचे एनपीटीइएलमध्ये यश

केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालय आणि आयआयटीतर्फे घेतल्या जाणा-या स्वयम (एनपीटीइएल) लोकल चॅप्टर उपक्रमांतर्गत आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामधील विविध शाखेतील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांमधील ऑनलाईन कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केले.
जानेवारी ते एप्रिल २०१९ पर्यंत घेतलेल्या ऑनलाईन कोर्समध्ये महाविद्यालयाच्या ११ प्राध्यापक व ९ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. यामध्ये कॉम्पुटर विभागातील रफिक गडकरी व पूजा शेळके यांनी सुवर्ण, डॉ. राहुल दंडगे, प्रा. पूनम क्षीरसागर, श्रुती तिखे व दत्तात्रय करकरे यांनी रौप्य श्रेणी मध्ये तर इतर ९ जणांनी विशेष प्रविण्याण्यासह यश संपादन केले आहे.
जुलै ते डिसेंबर २०१८ च्या सत्रामध्ये महाविद्यालयाच्या एकूण ४८ प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी एनपीटीइएलचे विविध विषयातील ऑनलाईन कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यामध्ये प्रा. मुश्ताक गडकरी व प्रा. आशिष सुवारे हे सुवर्ण श्रेणीमध्ये अव्वल ठरले. तर प्रा. पूनम क्षीरसागर यांनी रौप्य श्रेणीमध्ये अव्वल स्थान पटकाविले. प्रा. सुदर्शन जाधव, प्रा. गीतांजली सावंत, प्रा. सुरेश कोळेकर, प्रा. शहाजी देठे, केतन चव्हाण, आशुतोष गावडे, प्रीती सालीम, पल्लवी निवळकर, राज सुर्वे, अभी मेस्त्री यांनीही रौप्य पदक मिळविले. इतर १५ जणांनी विशेष प्राविण्यासह कोर्स पूर्ण केला.
महाविद्यालयीन प्राध्यापक व विद्यार्थ्यांना हे ऑनलाईन कोर्स फार उपयुक्त ठरत असून त्यासाठी सर्वाना प्रोत्साहित करण्यात येते. यासाठी महाविद्यामध्ये स्वतंत्र सेल देखील स्थापन करण्यात आला आहे. सर्व यशस्वी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत व सर्व विभागप्रमुखांनी अभिनंदन केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button