
कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्यास राज्य शासन तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही.
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी राज्य शासन तयार आहे. कोल्हापूरमध्ये सर्किट बेंचची स्थापना निश्चित होईल, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. फडणवीस शुक्रवारी कोल्हापूर दौर्यावर आले होते. यावेळी कोल्हापूर विमानतळ येथे खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी खंडपीठ बेंच कोल्हापूर येथे निश्चित स्थापन होणार, त्यासाठी शासनाकडून पाठपुरावा सुरु असून मुख्य न्यायमूर्तीसोबत चर्चा केली आहे.
लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन शिष्टमंडळास दिले. कृती समितीचे निमंत्रक व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍ ड. व्ही. आर. पाटील यांनी कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसोबत बैठक घेऊन सर्किट बेंच स्थापनेचा निर्णय घ्यावा, अशी विनंती केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे निश्चित स्थापन होणार, त्यासाठी शासनाकडून पाठपुरावा सुरू असून मुख्य न्यायमूर्तींसाबत चर्चा केली आहे. लवगरच निर्णय घेवू, असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.www.konkantoday.com




