
गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी कोकण विकास समितीचे कोकण रेल्वे बोर्डाला साकडे !
यंदा २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार असून २३ जूनपासून आरक्षणही खुले होणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवात गावी येणार्या चाकरमान्यांचे होणारे हाल थांबवण्यासाठी कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर व सदस्यांनी आतापासूनच पुढाकार घेतला आहे. चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी रेल्वे बोर्डाला सूचनांचे निवेदन देत साकडे घातले आहे. विविध सुधारणा करण्याचा आग्रह धरण्यात आला आहे.
मध्य व कोकण रेल्वे प्रशासन गणपती स्पेशलच्या जादा फेर्या चालवून गणेशभक्तांना दिलासा देत असले तरी गाव गाठताना चाकरमान्यांना यातायात करावी लागते. या पार्श्वभूमीवर कोकण विकास समितीने चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेसह कोकण रेल्वेला आवश्यक सेवा सुधारणांबाबत निवेदन दिले आहे. अनारक्षित गाड्या चालवून डबे वाढवणे, पनवेल ऐवजी दिवा, दादर किंवा एलटीटीहून विशेष गाड्या चालवणे, अपारंपारिक स्थानकांवर थांबे देणे अशा विविध सुधारणा सूचवण्यात आल्या आहेत.www.konkantoday.com