
चित्रपटसृष्टी आणि मालिका क्षेत्रातील मोठं नाव अभिनेता मुकुल देव याचं निधन
चित्रपटसृष्टी आणि मालिका क्षेत्रातील मोठं नाव अभिनेता मुकुल देव याचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी त्याने शेवटचा श्वास घेतला. अद्याप त्याच्या निधनाचं कारण समोर आलेलं नाही.मात्र त्याच्या अचानक झालेल्या निधनाने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. आयएएनएसने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
सन ऑफ सरदार, आर राजकुमार, जय हो यासांरख्या चित्रपटातील त्याच्या भूमिका अजरामर आहेत. नुकताच त्याचा भाऊ राहुल देव याच्या अंत द एंड या चित्रपटात त्याने भूमिका साकारली होती