
जगबुडी पुलावर महामार्ग विभागाकडून प्रवाशांच्या जीविताशी खेळ सुरूच, गर्डर हटवून उभी केली रिकामी पिंप.
मुंबई-गोवा महामार्गावरील नव्या जगबुडी पुलावरून कार नदीत कोसळून ६ जणांचा हकनाक बळी गेला असतानाही राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून कुचकामी उपाययोजनांचा अवलंब सुरू आहे. अपघात रोखण्यासाठी दुर्घटनेनंतर जगबुडी पुलाच्या हॉटस्पॉटवर उभारलेले गर्डर काही तासातच हटवून तेथे २ रिकामी पिंप उभी करत खात्याने बेफिकीरपणाचा कळस केला आहे. यामुळे आणखी बळी हवेत का? असा उद्विग्न सवाल उपस्थित करत राष्ट्रीय महामार्ग खात्यावर टीकेची झोड उघटवली जात आहे.मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यापासून परशुराम घाटापर्यंत वाहनचालकांचा प्रवास वेगवान झाला असला तरी भोस्ते घाटातील अवघड वळणांसह नव्या जगबुडी पुलावरील वळणांमुळे अपघाताची मालिका थांबेनाशी झाली आहे. ३ दिवसांपूर्वी घडलेला अपघात ३ वर्षातील मोठा प्राणांतिक अपघात घडल्याने नवा जगबुडी नव्याने चर्चेत आला आहे.www.konkantoday.com