वैष्णवी आत्महत्या प्रकरण: पुण्यातून राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंना अटक!


वैष्णवी आत्महत्या प्रकरणी अखेर पिंपरी -चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवनेला स्वारगेट मधून अटक केली आहे. सात दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. या प्रकरणामुळे अवघ राजकारण तापलं होतं. अखेर त्यांच्या पिंपरी- चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या आठवड्यात राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या दिवसापासून राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशीला हगवणे हे फरार होते. पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना आधीच पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

काल दिवसभर राजकीय नेत्यांनी कस्पटे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केलं. लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल अस आश्वासन दिलं होतं. पोलिसांची सहा पथक आरोपींचा शोध घेत होते. अखेर त्यांना स्वारगेटमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अजित पवार यांनी देखील फोन द्वारे कस्पटे कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला होता. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अस आश्वासन दिल होत.

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे बदलत होते ठिकाण

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना शोधण्यासाठी गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्याच्या एकूण आठ टीम त्यांच्या मागावर होत्या. या प्रकरणात पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हे स्वतः लक्ष ठेवून होते. आवश्यक त्या सूचना देत होते. प्रत्येक वेळी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा ठिकाण (लोकेशन) बदलत असल्याने त्यांना पकडणं अवघड होत. अखेर त्यांना आज स्वारगेट मधून साडेपाचच्या सुमारास अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button