
पहिल्या पावसाचा तडाखा, संगमेश्वर बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य.
राज्य परिवहन महामंडळाच्या संगमेश्वर बसस्थानकात सध्या चिखलाचे साम्राज्य पसरले असून प्रवाशांना येथून चालणेही कठीण झाले आहे. स्थानकातील सर्व दुकानांसमाेर चिखल पसरल्याने दुकानात ग्राहक येणे मुश्किल बनले असून यामुळे व्यावसायिकांचे माेठे नुकसान हाेत आहे. बसस्थानकाबाहेर सुरू असणाèया पुलाच्या कामामुळे गटाराचे सर्व चिखलमिश्रित पाणी बसस्थानकात येत आहे. संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांची सुरक्षा सद्यस्थितीत धाेकादायक बनल्याने संबंधित यंत्रणेने तातडीने लक्ष देण्याची मागणी प्रवासीवर्गाने केली आहे.संगमेशवर बसस्थानकाबाहेर असणारे गटार मुंबई-गाेवा राष्ट्रीय महामार्गाच्या साेनवी नदीवरील पुलांच्या कामादरम्यान ताेडण्यात आल्याने सध्या पावसाचे सर्व चिखलमिश्रित पाणी बसस्थानकाच्या प्रवेशद्ऐरातून स्थानक परिसरात पसरले आहे.www.konkantoday.com