वादळी वारा व पाऊस यामुळे बाधित झालेला वीजपुरवठा सुरू करण्यासाठी महावितरणाचे युद्ध पातळीवर प्रयत्न.

२०-२१-२२ मे २०२५ रोजी झालेल्या वादळी वारा व पाऊस यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक ठिकाणचा वीज पुरवठा बाधित आहे. पोल पडणे, वीज यंत्रणेवर झाड पडणे आदी कारणामुळे हा पुरवठा बाधित आहे.ग्राहकांचा वीज पुरवठा लवकर सुरु करण्याकरता महावितरण कर्मचारी व अधिकारी अथक परिश्रम घेत, अहोरात्र शिफ्टमध्ये काम करत आहेत. तरी वीज ग्राहकांनी महावितरण ला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

वीज ग्राहक अधिक माहिती करिता व आपल्या तक्रारी नोंदवण्या करिता १९१२, १८००-२३३-३४३५ व १८००-२१२-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात.तसेच जिल्ह्यातील बाधित वीज पुरवठ्याच्या अनुषंगाने पुढील माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.पडलेले लघुदाब पोल – ६५/४९पडलेले उच्चदाब पोल – ४२/१४बाधित रोहित्रे – ४२५७/४१२६प्रभावित गावे – ९०८/८७८प्रभावित ग्राहक – ३३१२७६/ ३२२९४१महावितरणचे अंदाजित नुकसान – ३४ लाख(नवीन माहिती उपलब्ध होईल तसे या आकडेवारीत बदल अपेक्षित)जनसंपर्क अधिकारी (प्रभारी) महावितरणwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button