
कॅरम पंच परीक्षेत रत्नागिरीच्या तिघांचे यश
रत्नागिरी येथे पार पडलेल्या 95 महाराष्ट्र राज्य व आंतर जिल्हा अजिंक्य स्पर्धेच्या दरम्याने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कॅरम पंच परीक्षेत रत्नागिरीच्या सुहास माईणकर, सागर कुलकर्णी व योगेश आपटे हे तिघेही उत्तीर्ण झाले. या परीक्षेसाठी राज्यातून नऊ परीक्षार्थी सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय कॅरम पंच अजित सावंत यांचे मार्गदर्शन लाभले होते . आमदार उदय सामंत,शेखर निकम, जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, सचिव मिलिंद साप्ते, खजिनदार नितीन लिमये यांनी यशस्वीतांचे अभिनंदन केले आहे.
www.konkantoday.com