
देवरुख- संगमेश्वर मार्गावरील काेसुंबजवळ क्रेनखाली सापडून महिलेचा जागीच मृत्यू
देबरुख- संगमेश्वर मार्गावरील काेसुंबनजीक असलेल्या स्वामी समर्थ मठ येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या महिलेला क्रेनने धडक दिल्याने चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी 9.15 वाजता झाला. सावित्री राजाराम सावंत (65, कनकाडी एरंडेवाडी, ता. संगमेश्वर) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. देवरुख पाेलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, जयेंद्र गजानन सावंत (कनकाडी एरंडेवाडी) यांनी िफर्याद दिली आहे. जयेंद्र सावंत व सावित्री सावंत या दुचाकीवरून (एमएच 08, एन-0388) रविवारी सकाळी बुरंबी येथे मुलीकडे जात हाेत्या.
बुरंबीच्या दिशेने जात असताना काेसुंबनजीक असलेल्या स्वामी समर्थ मठ येथे दुचाकीस्वार जयेंद्र सावंत याने दुचाकी थांबवली. यावेळी सावित्री सावंत या रस्त्यालगत उभ्या हाेत्या. एहम्मद अली रझा (27, उत्तर प्रदेश) क्रेन घेऊन (एमएच 43, बी 1345) देवरुखहून संगमेश्वरच्या दिशेने जात हाेता. काेसुंब येथील उतारात एहम्मद याचे क्रेनवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत उभ्या असलेल्या सावित्री यांना जाेरदार धक्का बसल्याने त्या क्रेनखाली चिरडल्या गेल्या. अपघातात दुचाकीचे नुकसान हाेऊन जयेंद्र सावंत यांच्याही पायाला दुखापत झाली.www.konkantoday.com