
चिपळूण शहरानजिकच्या कळंबस्ते येथे नाेकरीचे आमिष दाखवत दाेघांची 13 लाखांची आर्थिक फसवणूक.
नाेकरीला लावताे असे आमिष दाखवत चिपळूण शहरानजिकच्या कळंबस्ते येथील 59 वर्षीय प्राैढासह अन्य एकाची तब्बल 13 लाख 24 हजार 800 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी येथील पाेलीस स्थानकात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. 15 मार्च 2024 ते 11 जुलै 2024 या कालावधीत कळंबस्ते येथे घडली.
शरद विजयकुमार पवार (रा. करंजे, ता. करमाळा, जि. साेलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर याबाबतची िफर्याद सुभाष भगवान घाडगे (59, रा. कळंबस्ते ाटकाजवळ, मुळ रा. तुळशी, ता. साेलापूर) यांनी पाेलीस स्थानकात दिली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार याने नाेकरी लावताे असे सांगून सुभाष घाडगे यांची 9 लाख 4 हजार 800 रुपये व शेषराव येनाजी राठाेड यांची 4 लाख 20 हजार अशी एकूण 13 लाख 24 हजार 800 रुपयांची फसवणूक केली. आपण फसल्याचे लक्षात येताच सुभाष घाडगे यांनी पाेलीस स्थानकात धाव घेतली. अधिक तपास चिपळूण पाेलीस करत आहेत.www.konkantoday.com