
गुहागर ग्रामीण रूग्णालयात कर्मचाऱ्याने घातला धिंगाणा, वैद्यकीय अधिकाऱ्यांशी केले गैरवर्तन.
गुहागर शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाèयांशी गैरवर्तन करून ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाèयाने धिंगाणा घातला. या कर्मचाèयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये शनिवारी दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. रुग्णालयातील रवींद्र भागाेजी जाधव या 40 वर्षीय कर्मचाऱ्याने रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त असलेले जयपाल रघुनंदन ढाले हे ड्युटी बजावत असताना त्यांच्यावर आरडाओरड करून बेशिस्त वर्तन केल्याची तक्रार करण्यात आली. येथील कार्यालयातील सॅनिटायझरची बाटली संशयित आराेपीने स्वतःच्या अंगावर ओतून आपण इथेच जीव देऊन सर्वांची नावे लिहीन, अशी धमकी दिली अशी फिर्याद वैद्यकीय अधिकारी जयपाल रघुनंदन ढाले यांनी गुहागर पोलीस ठाण्यामध्ये दिली.