
एकीकडे सीएनजी गाड्या घेण्यासाठी सरकार करतेय आवाहन मात्र सततच्या ’सीएनजी’ तुटवड्यामुळे वाहनधारक हाेताहेत हैराण.
रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यांत गेल्या आठवड्यापासून सीएनजी गॅसचा तुटवडा जाणवत असून वाहन चालक आणि विशेषतः रिक्षा चालक अक्षरशः हैराण झाले आहेत. पर्यटकांची वदर्ळ तसेच लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे व इतर राज्यांमधून चाकरमानी दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सीएनजी गॅसची कमतरता भासत असल्याने स्थानिक रिक्षा व्यावसायिकांना याचा माेठा फटका बसत आहे. जिल्ह्यातील सीएनजी पंपावर हाेत असलेला अपुरा पुरवठा, कमी दाबाने हाेणारे वितरण आणि लांबच लांब रांगा यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. अनेकवेळा गॅस कमी दाबाने मिळत असल्याने ताे भरायला अधिक वेळ लागताे. परिणामी रिक्षा चालकांचे उत्पन्न घटते आणि खर्च वाढताे. दिवसभर रांगेत थांबावे लागल्याने प्रवासी सेवा देणे अशक्य बनले असून याचा थेट परिणाम रिक्षा चालकांच्या उत्पन्नावर हाेत आहे. जिल्हयात येणाèया पर्यटकांनाही सीएनजी गॅसचा पुरवठा कमी हाेत असल्याने फटका बसत आहे. प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घ्यावी, अशी मागणी हाेत आहे.