फणस एक- व्यवसायातील संधी अनेक” विषयावर २२ मे रोजी कार्यशाळा माजी खासदार विनायक राऊत आणि “माविम”च्या अध्यक्षा सौ. ज्योती ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती.

“रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोकणवासीयांसाठी रत्नागिरी येथे “फणस एक- व्यवसायातील संधी अनेक” या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा २२ मे रोजी दुपारी २ वाजता दैवज्ञ भवन हॉल, नाचणे रोड रत्नागिरी येथे होणार आहे. यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा शिवसेना नेते सचिव विनायक राऊत व शिवसेना उपनेत्या तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा सौ. ज्योती ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थिती असणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, शाखाप्रमुख, सरपंच, बचत गट प्रतिनिधी व व्यवसाय करणारे इच्छुक प्रतिनिधी यांनी यावेळी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा महिला संपर्क संघटक सौ. नेहा माने आणि रत्नागिरी जिल्हा महिला संघटक सौ. वेदा फडके यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button