
जयगडजवळ आढळला अनोळखी मानवी सांगाडा
जयगड: जयगड ते खंडाळा जाणारे बायपास रोडवर उंबरटेंबा येथे १७ मे रोजी सकाळी १०.३५ च्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेला सांगाडा आढळून आला. हा मृतदेह पूर्णपणे कुजल्याने त्याची हाडे निखळलेली होती आणि रानटी प्राण्यांनी (कोल्हे, कुत्रे) ओढल्यामुळे ती इतरत्र विखुरलेल्या अवस्थेत होती.या घटनेची नोंद जयगड पोलीस ठाण्यात १७ मे रोजी दुपारी ३.१२ वाजता करण्यात आली आहे. मृतदेहाची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.