
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने दापोलीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज.
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने आपत्ती निवारणासाठी दापोली नगरपंचायत सज्ज झाली आहे. याबाबत मुख्याधिकारी व प्रशासनासोबत झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत सर्व तयारी पूर्ण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. शिवाय गटारांची कामेही युद्धपातळीवर करण्यात येत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पावसाळ्यात पाणी भरणे, झाडे पडणे अशा अनेक समस्यांचा नागरिकांना सामोरे जावे लागते. यासाठी नगर पंचायत प्रशासनाने आवश्यक साहित्य फावडे, टिकाव, पहार, लाईफ जॅकेट, ट्यूब, लाईफ बोये, दोरी, कोयती, फर्शी, लाकडे कापण्यासाठी यंत्र, घमेली असे साहित्य सज्ज ठेवले आहे.
शिवाय वेळीच घटनास्थळी जाण्यासाठी, आपत्तीची माहिती घेण्यासाठी बचाव पथकासह इतर पथके देखील तयार करण्यात आली आहेत. गटारांमध्ये पाणी साचून गटारे तुंबुन रस्त्यावर पाणी येते. त्यामुळे पाणी गटातून न गेल्यास पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे दरवर्षी गटारे सफाई करण्यात येते. त्यामुळे नगर पंचायतीची गटारे सफाई देखील अंतिम टप्यात आली आहे.www.konkantoday.com