
रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षी डेंग्यूचे २५६ रुग्ण.
रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षी डेंग्यूचे २५६ रुग्ण आढळले होते. आरोग्य विभागाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे यावर्षी हे प्रमाण कमी होऊन चार महिन्यात केवळ ४ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. १६ मे रोजी होत असलेल्या डेंग्यू दिनाच्या अनुषंगाने जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी ही माहिती दिली आहे. दश्वर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांच्या सूचनेनुसार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात येत आहे. डेंग्यू दिनाच्या अनुषंगाने किटकजन्य रोगनियंत्रण उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविणेसाठी जिल्ह्यामध्ये वर्षभर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्याबाबत सर्व आरोग्य कर्मचार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.www.konkantoday.com