
दापोलीच्या प्रभारी नगराध्यक्षपदी खालीद रखांगे
दापोली नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे खालीद रखांगे यांची प्रभारी नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नगराध्यक्षपदासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २८ मे रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नगराध्यक्षा ममता मोरे यांच्याविरोधात १६ विरुद्ध १ अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यामुळे त्यांना या पदावरून हटवण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांची प्रभारी नगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.www.konkantoday.com




