
चिपळूण शहरातील तीनबत्तीनाका येथील हॉटेल मेजवानी येथून चोरीला गेलेला दीड लाखाचा मोबाईल हस्तगत.
चिपळूण शहरातील तीनबत्तीनाका येथील हॉटेल मेजवानी येथून एका ग्राहकाचा चोरीस गेलेला दीड लाख रुपये किंमतीचा मोबाईल पोलिसांनी येथीलच एका मोबाईल शॉपीतून हस्तगत करत चोरीचा छडा लावला. मोबाईलचे मूळ मालक अभिषेक बिस्वाल (रा.ओडीशा) यांच्याकडे गुरुवारी पोलिसांनी हा मोबाईल सुपूर्द केला. मात्र चोरटा पसारच असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. अभिषेक बिस्वाल हॉटेल मेजवानी ऍण्ड लॉज येथे २३ जानेवारी रोजी राहण्यासाठी आले होते. याचदरम्यान, त्यांचा दीड लाख रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्याने लंपास केला होता.www.konkantoday.com