
कोकण मार्गावरुन धावणार्या रेल्वेतून पडून २० वर्षीय युवकाचा मृत्यू
कोकण मार्गावरुन धावणार्या रेल्वेतून पडून २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कोतवलीनजीक मंगळवारी उघडकीस आली. करणकुमार कृष्णमोहन साह असे मृत युवकाचे नाव आहे. तो पनवेल ते चिपळूण असा रेल्वे गाडीने प्रवास करत होता. तोल गेल्याने खाली पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे कर्मचारी गस्त घालत असताना त्याचा मृतदेह दृष्टीस पडला. याबाबत पोलीस ठाण्यात कळिवल्यानंतर घटनास्थळी पोहचून पोलिसांनी पंचनामा केला.www.konkantoday.com