
विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू.
विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. राखी अजय पवार (वय ४४, रा. नवलाई पावणाई मंदिर जवळ, तांबट आळी, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ६) सकाळी सव्वासातच्या सुमारास सीपीआर हॉस्पीटल कोल्हापूर येथे घडली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राखी पवार हिने कोणत्यातरी अज्ञात कारणातून हेरबीसाईड नावाचे विषारी औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे दाखल केले