
कोतळूक ग्रामदेवता सहाण ते खंडणवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे उदघाटन.
आबलोली : गुहागर तालुक्यातील कोतळूक गावातील कोतळूक ग्रामदेवता सहाण ते खंडणीवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे उद्घाटन भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य निलेश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जेष्ठ ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते गंगाराम पाष्टे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रानुसार महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री,पालकमंत्री उदय सामंत यांनी जनसुविधा योजनेमधून मंजूर केलेल्या ५ लाख रुपये निधीतून हे काम पूर्ण झाले. भाजपाचे गुहागर विधानसभा निवडणूक प्रमुख, माजी आमदार डॉ. विनय नातू, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांनी तात्कालीन भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस कोतळूक ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक यांच्या मागणीवरून हे काम मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न केले. “मंत्रालयात शासकीय नोकरी करताना आपल्या गावाबरोबरच ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांची कामे पूर्ण करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. निवडणूक झाल्यानंतर राजकीय पक्ष बाजूला ठेवून कोणत्याही राजकीय दृष्टीने काम न करता सामाजिक भावना ठेवून मिळेल त्या राजकीय पक्षाकडून काम केले. तसेच काम भविष्यात आजच्या तरुण पिढीने केले, तर ग्रामीण भागातील विकास अधिक गतीने व्हायला वेळ लागणार नाही,” असे मत गंगाराम पाष्टे यांनी व्यक्त केले. भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे मनोगत व्यक्त करताना सामाजिक भावनेतून महायुतीचे सर्व पक्षातील कार्यकर्ते काम करत असून दिलेला शब्द पाळणे ही आमच्या पक्षाची शिकवण असून सामाजिक काम, विकास कामे ही होत राहतीलच पण गावाकडील तरुणांनी मुंबईला न जाता केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजना, बचत गटाच्या माध्यमातून छोटे व्यवसाय निर्माण करून रोजगार निर्मिती करून आपल्या गावाचा, भागाचा कायापालट करून एक आदर्श निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला कोतळूक ग्रामपंचायत सरपंच सौ. प्रगती मोहिते, भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस, ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक, सचिन भेकरे, सुनील आगिवले, भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते सुनील भेकरे, बुथ प्रमुख अनिल आरेकर, सीताराम गोरिवले, सोनू पाष्टे, गणपत गोरिवले, रामकृष्ण गोरिवले, वसंत गोरिवले, अनंत गोरिवले, मालोजी गोरिवले, सुनील गोरिवले, शांताराम गोरिवले, प्रशांत पाष्टे, तुषार गोरिवले आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.