
मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामामुळे सोनवी पुलावर दररोज वाहतूक कोंडी!
मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर येथील सोनवी पूल परिसरात चौपदरीकरणाच्या कामामुळे वाहतूक कोंडीचा सामना बाहनचालकांना करावा लागतो. चारचाकी वाहनांबरोबच अवजड वाहनेही ये-जा करीत असल्याने कोंडीतून सुटका होण्यासाठी एक ते दोन तास लागतात. त्यामुळे पर्यटकांसह नागरिकांना ठरलेल्या वेळेत नियोजित ठिकाणी पोहोचणे अवघड होत आहे. सध्या उन्हाळी सुट्यांमुळे चाकरमान्यांसह पर्यटकांची पावले पर्यटनस्थळांकडे वळल्याने वाहतुकीत भर पडली आहे. वाहतूक पोलिसांसह ठेकेदाराकडून योग्य नियोजन होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण होत आहे. येथील काम पूर्ण होणे सध्यातरी अशक्य असल्याने पावसाळ्यात प्रशासनाची सत्वपरीक्षाच आहे. लोक प्रतिनिधींचे या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे वाहन चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.www.konkantoday.com