
मिरकरवाडा जेटीवर नौकांना येण्याच्या मार्गात २१ नौकांचा अडथळा, पर्ससीन नेट मच्छिमारांची मत्स्यव्यवसाय खात्याकडे धाव.
पावसाळी मासेमारी बंदीसाठी अजून २० दिवस बाकी असताना यावर्षी २१ नौकांना शाकारून ठेवत मिरकरवाडा जेटींवर इतर नौकांना येण्याच्या मार्गात अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे पर्ससीननेट मच्छीमार रत्नागिरी तालुका असोसिएशनने सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांकडे मंगळवारी धाव घेत इतर नौकांना जेटी मोकळी करून देण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली. नोटीस देवूनही शाकारून ठेवलेल्या नौका जेटीवरून न हलवणार्या नौका मालकांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्या बाबत दिलेल्या निवेदनानुसार, पावसाळी मासेमारी बंदी ३१ मे पासून सुरु होत आहे.
यंदाचा मासेमारी हंगाम फायद्यात गेलेल्या २१ नौका मालकांनी त्यांच्या नौका मिरकरवाडा बंदरातील जेटींवर शाकारून ठेवल्याची तक्रार पर्ससीननेट मच्छीमार रत्नांगिरी तालुका असोसिएशनने मांडली आहे. या हंगामात नुकसान भरून येईल, या आशेवर मासेमारी करून मिरकरवाडा बंदरात येणार्या नौकांना जेटीवर येण्यासाठी त्या शाकारून ठेवलेल्या नौकांचा अडथळा होत आहे. समुद्रात मासेमारी करून त्या नौकांना जेटीवर येण्यासाठी व मासळी उतरवून घेताना अडथळा येत असल्याची तक्रार सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाकडे मांडण्यात आली आहे.www.konkantoday.com