
समाजातील विविध प्रश्न तळमळीने मांडताना कोणावरही अन्याय होऊ नये -मंत्री उदय सामंत.
झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत उपस्थित होते. प्रसार माध्यमांमध्ये प्रशंसनीय काम करत असलेल्या या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी त्यांचे कौतुक केले. समाजातील विविध प्रश्न तळमळीने मांडताना कोणावरही अन्याय होऊ नये, अशी अपेक्षा यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केली.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या सर्वच पत्रकारांना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी शुभेच्छा दिल्या व त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळातील सहकारी गिरीशजी महाजन, आमदार प्रवीणजी दरेकर, आमदार प्रसादजी लाड, प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, झी 24 तासचे मुख्य संपादक कमलेशजी सुतार व मान्यवर उपस्थित होते.