
चिपळूण शहरात अतीवृष्टी सुरूच, तिसर्या दिवशीही शहर पाण्यात
चिपळूण ः सतत तीन दिवस पडणार्या पावसामुळे चिपळूण शहराला दोन दिवस पाण्याने वेढले असताना आता तिसर्या दिवशीही मुसळधार पावसामुळे चिपळूणमध्ये अनेक भागात पाणी भरले आहे. जुना बस स्टँड, चिंचनाका, खेर्डी, भाजी मार्केट आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. यामुळे चिपळूणमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिपळूण गोवा व चिपळूण कराड आदी मार्ग ठप्प झाले आहेत.
www.konkantoday.com




