
आपत्कालीन वैद्यकीय सेवेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याला मिळणार एक आयसीयू बालरूग्णवाहिका.
आपत्कालीन वैद्यकीय सेवेंतर्गत १०८ रूग्णवाहिकेच्या माध्यमातून रूग्णांना तातडीची मदत मिळते. आता या सेवेंतर्गत अत्याधुनिक १ हजार ७५६ रूग्णवाहिका राज्याला मिळणार आहेत. रत्नागिरीला एक आयसीयु बालरूग्णवाहिका मिळणार आहे. या रूग्णवाहिका प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहेत, याची अंमलबजावणी येत्या नोव्हेंबरपासून होणार आहे.राज्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील रूग्णांना तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी १०८ रूग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली. आता या माध्यमातून अत्याधुनिक रूग्णवाहिकांच्या माध्यमातून अद्ययावत सेवा प्रदान केली जाणार आहे. या रूग्णवाहिकेमध्ये डॉक्टर आणि निम्नवैद्यकीय कर्मचारीही असणार आहेत. हा नवीन १०८ रूग्णवाहिका कार्यक्रम राज्यभर राबविण्यात यणार आहे. यात भागीदार संस्था १ हजार ७५६, अत्याधुनिक रूग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहे. आपत्कालीन प्रसंगी रूग्णांना तातडीची काळजी आणि उपचार या रूग्णवाहिकेमध्ये मिळेल. त्यात प्राणवायू सुविधा, अत्याधुनिक स्ट्रेचर आणि हृदयविकारासदर्भातील उपकरणे असतील.www.konkantoday.com