
कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतोय या हल्ल्यात मी मेलो असतो तर बरे झाले असते.
भारताने पाकिस्तानवर स्ट्राईक केला आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी ठिकाणांना भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले. त्यात बहावलपूर येथे असणाऱ्या जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयालाही टार्गेट करण्यात आलेयाठिकाणी जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचं कुटुंब होते. या हल्ल्यात मसूदच्या कुटुंबातील १० जण आणि त्याच्या जवळच्या ४ जणांचा मृत्यू झाला आहे. मसूद अजहरने या घटनेला पुष्टी दिली आहे.या हल्ल्यानंतर मसूद अजहरने म्हटलं की, भारतीय हल्ल्यात माझ्या कुटुंबाचे १० सदस्य आणि ४ जवळचे सहकारी मारले गेले.
या हल्ल्यात मी मेलो असतो तर बरे झाले असते असं त्याने सांगितले. मौलाना मसूद अजहरच्या मोठ्या बहिणीसह मौलाना कशफ साहबचं पूर्ण कुटुंब, शहीद आणि मुफ्ती अब्दुल रऊफचे नातवंडे, बाजी सादियाचा पती आणि तिच्या मोठ्या मुलीचे ४ मुले जखमी झाले आहेत. या हल्ल्यात महिला आणि मुले मारली गेली असं जैश ए मोहम्मद संघटनेने माहिती दिली.भारतीय सैन्य दलाने रात्री उशीरा ९ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट केले. त्यात जैश ए मोहम्मदचा गड असणाऱ्या पंजाबच्या बहावलपूर येथेही हल्ला करण्यात आला. पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. पहलगामच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यात अनेक महिलांना विधवा बनवले होते. धर्म विचारून हत्या केल्याचा आरोप होता. या दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. दहशतवाद्यांनी कधी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा त्यांना मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होते. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर हाती घेत दहशतवाद्यांना टार्गेट केले.