
महाराष्ट्र ग्रामीण, विदर्भ कोकण ग्रामीण बँकांचे एकत्रीकरण, आता महाराष्ट्र ग्रामीण बँकेची स्थापना.
भारत सरकारच्या एक राज्य एक ग्रामीण बँक या धोरणास अनुसरून महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भकोकण ग्रामीण बँक एकत्रीकरण कार्यक्रम १ मे रोजी झाला. या एकत्रीकरणामुळे महाराष्ट्र ग्रामीण बँक स्थापन झाली आहे. याचा उदघाटन सोहळा महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय कार्यालय रत्नागिरी येथे संपन्न झाला. या एकत्रीकरणामुळे ग्रामीण भागातील बँकिंग सेवा अधिक व्यापक आणि सशक्त होणार आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र ही या नवीन बँकेची पुरस्कृत बँक असल्याचे सांगण्यात आले. या उदघाटन समारंभाचे आयोजन महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या रत्नागिरी कार्यालयाने केले होते. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र रत्नागिरीचे विभागीय व्यवस्थापक सागर नाईक , बँक ऑफ इंडिया रत्नागिरीचे अग्रणी जिल्हा प्रबंधक दर्शन कानसे यांची प्रमुख उपस्थिती होती.www.konkantoday.com