खेड तालुक्यातील आयनी जूवळा येथील रेल्वे ट्रॅकजवळरेल्वेच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

खेड तालुक्यातील आयनी जूवळा येथील रेल्वे ट्रॅकजवळ ०३ मे रोजी सकाळी रेल्वेच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सौरभ सुभाष तांबे (रा. ता. खेड) असे मृत तरुणाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ तांचे हा आज सकाळी सुमारे १० वाजता घरातून पाण्याची बाटली घेण्यासाठी बाहेर पडला होता. त्यानंतर, मंगला एक्सप्रेसच्या चालकाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १० वाजून ३२ मिनिटांच्या सुमारास आयनी जूवळा येथील रेल्वे ट्रॅकजवळ ट्रेनची धडक बसल्याने सौरभ गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button