
गुहागर तालुक्यातील दुचाकी अपघातात जखमी झालेल्या वृद्धाचे उपचाराच्या दरम्यान निधन.
गुहागर तालुक्यातील पवार साखरी, चिंचवड येथील ७९ वर्षीय सुरेश शंकर पवार यांचा दुचाकीवरून पडून जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना अधिक उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश पवार हे दुचाकीवरून पडल्याने जखमी झाले होते. त्यांच्या गावी (पवार साखरी) प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारासाठी २० एप्रिल रोजी श्रृंगारतळी येथील पवार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना वालावलकर रुग्णालय डेरवण येथे त्याच दिवशी २० एप्रिल रोजी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.