
बोरिवली येथून सावंतवाडी येथे जाणाऱ्या ओमकार ट्रॅव्हल्सची खासगी बसच्या अपघातात दोघांचा मृत्यू अनेक प्रवासी जखमी
मुंबई उपनगरातील बोरिवली येथून ओमकार ट्रॅव्हल्सची खासगी बस क्रमांक एमएच 47, वाय 7487 ही पस्तीस प्रवासी घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे निघाली होती. मात्र चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून तीस पेक्षा अधिक जखमी आहेत. त्यांच्यावर पनवेल तालुक्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.




