
नुकसान भरपाई मागायला गेलेल्याला वनविभागाच्या प्रवेशद्वारावरच मारहाण झाल्याची तक्रार वनविभागाकडून वृत्ताचा नकार.
रानडुक्कराच्या हल्ल्यात आपले वडील प्रभाकर काष्टे हे मृत झाले आहेत. त्याबाबत नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज केल्यावर आपल्याकडे ५ लाख रुपये लाच मागण्यात आली. शिवाय या बाबत माहिती अधिकारात अर्ज केल्यावर आपल्याला बोलावून वनविभागाच्या कार्यालयासमोर २७ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता बेदम मारहाण करण्यात आल्याची दापोली तालुक्यातील आघारी येथील अविनाश काष्टे यांनी दापोली पोलीस ठाण्यात केली आहे.काष्टे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की आपले वडील प्रभाकर काष्टे हे दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला रानडुक्कराने मागून धडक दिली.
यात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर आपण नुकसान भरपाई मिळण्यासाठी वनविभागाकडे अर्ज केला. वनविभाग कार्यालयाचे भरपाई प्रकरण कुठपर्यंत आले, याची आपण शहानिशा केली. मात्र आपल्याला तेथील अधिकारी व कर्मचार्याने २५ लाख रुपये मिळणार आहेत, ते मंजूर करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाचे ३ लाख व आमचे २ लाख द्यावे लागतील असे सांगितले. यानंतर एक महिना पूर्ण झाल्यावर अर्जाची दाद घेण्यात आली नाही. यानंतर आपण माहिती अधिकारात माहिती मागितल्यानंतर दोघांनी कार्यालयाच्या गेटजवळ या, असे सांगितले. त्यानुसार तिथे गेल्यावर धक्काबुक्की करत मारहाण केल्याची तक्रार काष्टे यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली आहे.याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता अशी कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय अविनाश काष्टे यांचे प्रपोजल नामंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली.www.konkantoday.com