
कोकणात आढळणार्या सुरंगीची राज्यात लागवड करण्याचा निर्णय.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरागांच्या परिसरात असलेल्या घनदाट जंगलात आढळणार्या सुरंगी वनस्पतीची आता राज्यभर लागवड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वनविभागाने राज्यातील ९०० वनक्षेत्रात सुरंगीची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला सुरंगीच्या झाडांची रोपे तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार आता विद्यापीठाकडून ५ हजार रोपे तयार करण्यात आली असून आणखी ५ हजार रोपे येत्या काळात तयार केली जाणार आहेत.
सुरंगीचे झाड तळकोकणातील सदाहरीत वनात आढळून येणारे मध्यम आकाराचे झाड असून त्याचे शास्त्रीय नाव मॅमीया सुरीगा अस आहे. मार्च आणि एप्रिल या महिन्यात या झाडांना फुलांचा बहर येतो. सुरंगीची फुले ही फुलोर्याला न येता फांद्यांना येताना नर फुलांना सुरंगी तर मादी फुलांना बुरंगी असे म्हटले जाते. दोन्ही झाडे दिसायला सारखीच असतात सुरंगीच्या फुलांना मनमोहक सुगंध असतो त्यामुळे या फुलांच्या कळ्यांना बाजारात मोठी मागणी आहे.www.konkantoday.com