
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना मुंबई येथे झालेल्या १७ व्या न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार
मुंबई येथे झालेल्या १७ व्या न्यूजमेकर्स अचिव्हर्स पुरस्कार सोहळ्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना सर्वोत्कृष्ट काम करणारा राजकारणी या पुरस्काराने संस्थेचे राम लाल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मंत्रीपदाच्या कारकिर्दीतील हा त्यांचा पहिलाच पुरस्कार आहे.दापोली विधानसभा मतदार संघातून विक्रमी मताधिक्क्यानी निवडून आलेल्या योगेश कदम यांच्याकडे गृहराज्यमंत्री पदासह अन्य गात्यांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून प्रशासकीय कामकाजाला गती देत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना नेते व माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघात विकासकामांची ’गंगा वाहती करण्यासह राज्यातील जनतेचे प्रश्न धसास लावण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. याची दखल घेवून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.www.konkantoday.com