
मुंबई-गोवा महामार्गावर मोरवडे गावानजिक एसटीची दुचाकीला धडक, स्वार गंभीर.
मुंबई-गोवा महामार्गावर मोरवडे गावानजिक अपघात झाला. शिव-खेड एसटी बसची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला, शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता हा अपघात घडला.महामार्गावरून वेगात जाणारी एसटी बस आणि समोरून येणार्या दुचाकीची जोरदार धडक झाली. यावेळी दुचाकी बसखाली आली, धडकेनंतर दुचाकी बसच्या चाकाखाली पूर्णपणे चिरडली गेली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतीस धाव घेत जखमी दुचाकीस्वाराला नजिकच्या रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.www.konkantoday.com