१०० दिवसीय कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र राज्यात प्रथम.

:रत्नागिरी: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक कोंकण परिक्षेत्र, हे १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे (Quality Council of India) करण्यात आलेल्या अंतिम मुल्यमापनात राज्यात सर्वोत्तम परिक्षेत्र ठरले आहे. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तजज्ञानाचा वापर इत्यादी १० मुदयांवर उत्कृष्ठ कार्य करणारे कार्यालय म्हणून निवड करण्यात आलेली आहे.मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र कार्यालयाकडून www.konkanrange.mahapolice.gov.in असे वापरण्यास सुलभ संकेतस्थळ तयार करण्यात आले.

संकेतस्थळावर परिक्षेत्रातील अद्यावत माहितीसह, सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे संपर्क क्रमांक, माहिती अधिकार अन्वयेची माहिती, महत्त्वाच्या शासकीय विभागांची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सुकर जीवनमान मध्ये कार्यालयात नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रार अर्जाचे योग्य नियोजन करण्यासाठी संगणकीय “अर्ज सनियंत्रण प्रणाली” (Application Tracking and Management System) तयार केली.

CEIR पोर्टल अंतर्गत परिक्षेत्रातून एकूण हरविलेल्या ६,४४८ मोबाईल पैकी ३,३०८ मोबाईलचा शोध लावून त्यापैकी १,०३८ मोबाईल प्रत्यक्षात हस्तगत करण्यात यश मिळवले. पोलिसांनी नागरिकांशी सौजन्यपूर्ण वागावे यासाठी पोलिसांना सॉप्ट स्किल ट्रेनिंग देवून पोलिसांची नागरिकांमधील प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला.तसेच कार्यालयीन सोयी सुविधा अंतर्गत पोलिसांच्या धकाधकीच्या जीवनमानामुळे पोलिसांना होणारे विविध आजार व त्यामुळे होणारे मृत्यू लक्षात घेऊन आहारतज्ञ सायली भोसले (Indian Nutrition Coach) यांच्यामार्फतआहारातील बदल व व्यायामाचे वेळापत्रक तयार करून दिल्याने ३० दिवसांत अधिकारी व अंमलदार यांचे वजन, मधुमेह, रक्तदाब यामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्यात यश प्राप्त केले. कोंकण परिक्षेत्रातील पोलीस अधिकारी/अंमलदार यांना त्यांच्या अडीअडचणी मांडण्यासाठी लांबून कार्यालयात न येता व्हीसीद्वारे अडचणी मांडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.

विशेष पोलिस महानिरीक्षक यांची भेटीची वेळ सकाळी ११ ते २ (सुट्टी व जिल्हा भेट वगळून) अशी निश्चित करून तसा फलक कार्यालयात लावण्यात आला आहे. कार्यालयाची अंतर्गत स्वच्छता व सुशोभीकरण करून अभ्यांगतांना बसण्याची, पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छता गृहाचे नुतनीकरण केले तसेच कार्यालयातील मुदतबाह्य अभिलेख नाश केले.या सर्वांचा कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी केलेल्या कार्यवाहीचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे करण्यात आलेल्या अंतिम मूल्यमापनांत कोंकण परिक्षेत्र हे राज्यात सर्वोत्तम परिक्षेत्र ठरले आहे. नागरीकांना विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र वेब साईट www.konkanrange.mahapolice.gov.in, सोशल मिडीया हॅन्डल्स facebook- IGP Konkan Range, X- IGP konkan Range, instagram-IGP Konkan Range ला भेट देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button