
समर्थ इन्वेस्टमेंट्स च्या वतीने समाजाच्या विविध क्षेत्रातील अविरत सक्रिय असणाऱ्या अशा समाजव्रर्तींना समर्थरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार.
समर्थ इन्वेस्टमेंट्स ह्याआमच्या रत्नागिरीमधील वित्तीय संस्थेतर्फे येत्या रविवारी ४ मे २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता, रत्नागिरीमधील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये एका दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आपला समाज अधिक मूल्याधिष्ठित व सुसंस्कारी व्हावा ह्यासाठी समाजाच्या विविध क्षेत्रातील अविरत सक्रिय असणाऱ्या अशा समाजव्रर्तींना, या निमित्ताने आम्ही समर्थरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत.
कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा बहुवीध क्षेत्रामधील राजेश आयरे, वीणा लेले, वल्लभ वणजू, उमा देवळे, सुनील बेंडखळे, डॉ. आदित्य मुकादम आदी समाजव्रतींना ह्या सन्मान सोहळ्यात ‘समर्थ रत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रत्नागिरीमधील सुविख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ. संतोष बेडेकर व ज्येष्ठ समाजव्रती व उद्योजक श्री. धरमसीभाई हिरजीभाई चौहान ह्यांच्या शुभहस्ते सदर पुरस्कार देण्यात येणार आहेत. देखणे सन्मानचिन्ह, उपरणे, रोख रुपये ५००१/- असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. सदर सन्मान सोहळा अधिक रंजक व संस्मरणीय व्हावा ह्यासाठी प्रथमच रत्नागिरीकरांसोबत गप्पा मारण्यासाठी येणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते श्री. पुष्कर श्रोत्री. आपल्या अष्टपैलू अभिनयाने रंगभूमी, छोटा पडदा, मोठा पडदा संपन्न करणाऱ्या पुष्कर ह्यांच्याशी मुक्त संवाद साधतील अभिनेत्री योगिनी पोफळे. पुष्करसोबत गप्पा, किस्से, अभिनय छटा अनुभवीताना रसिक मंत्रमुग्ध होऊन जातील ह्यात शंका नाही.
वरील सन्मान सोहळ्यासाठी प्रवेश विनामूल्य असून त्यासंदर्भातील प्रवेशिका रसिकांना ‘समर्थ इन्व्हेस्टमेंट्स’ च्या रत्नागिरी शाखेमध्ये म्हणजेच दुकान क्रमांक ५, सुहास प्लाझा, पारसे स्केयर कॉलनी, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथून सकाळी १० ते संध्याकाळी ६ ह्या कालावधीत प्राप्त होणार असून समर्थ च्या प्रिया थेटे व अनिरुद्ध थेटे ह्यांना अनुक्रमे ९९२२४१६०७६ व ९१५८८७०८२० ह्या क्रमांकावर संपर्क साधून आरक्षित करता येणार आहेत. ह्या संपूर्ण सोहळ्याचे सूत्र संचालन वैशाली वैशंपायन पोतदार करणार असून प्रमुख मार्गदर्शन श्री. अभिजित सरदेसाई ह्यांचे लाभले आहे. आमच्या समर्थ इन्व्हेस्टमेंट्सच्या माध्यमातून आम्ही सदैव समाजातील सर्व घटकांची अर्थ वृद्धी व्हावी ह्यासाठी कार्यरत असतो परंतू सोबत सामाजिक बांधिलकी जपावी म्हणून आम्ही समाजातील अविरतपणे व निरापेक्षतेने यथाशक्ती योगदान देणाऱ्यांचा सन्मान करून एक हृद्य व प्रेरक उपक्रम राबवावा ही मानसिकता घेऊन पुढे आलो आहोतआपले स्नेहांकित,प्रिया थेटे, गौरी जोशी, निलेश जोशी, अनिरुध्द थेटे