अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेत जि. प. शाळा कोतवडे घारपुरी सनगरेवाडी शाळेचे घवघवीत यश इयत्ता दुसरीतील अर्चित अक्षय घाणेकर केंद्रात दुसरा, तर सान्वी सुहास सनगरे तिसरी

रत्नागिरी : फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कोतवडे घारपुरी सनगरेवाडीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून, इयत्ता दुसरी शिकणारा अर्चित अक्षय घाणेकर याने ११६ गुण मिळवून केंद्रस्तरावर द्वितीय, तर इयत्ता दुसरीतील सान्वी सुहास सनगरे हिने ११२ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

इयत्ता चौथी व इयत्ता दुसरीचा निकाल १०० टक्के लागला आहे. या परीक्षेत इयत्ता पहिलीतील सिद्धी विनोद राणे (१०८ गुण), तन्मय रूपेश राणे (९६), इयत्ता दुसरीतील कुणाल आशिष शिंदे (१०६), वेदांग प्रसाद राणे (७४), अस्मी अमित ठोंबरे (७४), उर्वी कैलास सनगरे (६०), इयत्ता तिसरीतील आदिती तेजेष शिवलकर (२०६), वरद सुरेंद्र राणे (१४४), तर इयत्ता चौथीतील स्वामिनी प्रसाद आठवले (१९६), आराध्य दैवत पोवार (१७६), राज प्रदीप राणे (१४६) या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद कोतवडे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुजा उन्मेष केळकर व उपशिक्षिका सौ. अंजना दत्तात्रय बनगर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल शिक्षक आणि पालकांकडून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button