
महाराष्ट्रात ३ दिवस पावसाचा अलर्ट.
महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट ओढावले आहे. पुढील तीन दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भासह राज्यात अवकाळी पवासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.शनिवारी पहाटे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. रायगड, पनवेल, यवतमाळसह अनेक भागात शनिवारी पावासने हजेरी लावली. मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे.
मुंबई, पुणेकरांना उन्हापासून थोडासा दिलासा मिळणार आहे. पुण्यासह राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता पुणे वेधशाळे वर्तवली आहे. पुणे शहरासह सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागात आज पावसाची शक्यता आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून आज आणि उद्या येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात देखील आज दिवसभरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.