
कोकण मराठी साहित्य परिषद चिपळूण शाखेच्या अध्यक्षपदी अरूण इंगवले.
कोकण मराठी साहित्य परिषद चिपळूण शाखेच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक आणि नामवंत कवी अरुण इंगवले यांची एकमताने निवड करण्यात आली. लोकमान्य टिळक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात झालेल्या सभेत शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्षपदी प्रकाश काणे व प्राची जोशी, कार्याध्यक्षपदी राष्ट्रपाल सावंत, कोषाध्यक्ष सुनील खेडेकर, कार्यवाहपदी मनीषा दामले, सदस्यपदी अंजली बर्वे, रवींद्र गुरव, धनंजय चिंतळे, विनायक ओक, शिवाजी शिंदे, जिल्हा प्रतिनिधी राष्ट्रपाल सावंत यांची निवड करण्यात आली.www.konkantoday.com