
राजापुरात खैर चोरीप्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल.
राजापूर तालुक्यातील तळगाव वाकिरले येथील फिर्यादीच्या मालकीच्या जमिनीतील ९ खैर वृक्षांची परवानगी न घेता तोड करून चोरी केल्याप्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ फेब्रुवारी ते ७ एप्रिल २०२५ दरम्यान घडली. या प्रकरणी सुधाकर महादेव लाड (५५, सध्या रा. मुंबई) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी विलास धाकू सावंत, भूषण विलास सावंत, त्यांचे कामगार गंगाराम रघुनाथ सावंत, तेजस अजित पोटफोडे, सर्वेश किशोर पोटफोडे, उमाजी महादेव सौंदळकर आणि तुकाराम महादेव सौंदळकर (सर्व रा. तळगाव, ता.राजापूर) यांनी संगनमत करून फिर्यादी सुधाकर लाड यांच्या मालकीच्या जमिनीतील सुमारे ४० हजार रुपये किंमतीची ९ खैराची झाडे कोणतीही परवानगी न घेता तोडून चोरून नेली. फिर्यादी लाड हे सध्या मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.www.konkantoday.com