
रत्नागिरीत ठाकरे सेनेला बळ देण्यासाठी सेनेकडून नवीन पदाधिकार्यांच्या नियुक्त्या
ठाकरे शिवसेनेला रत्नागिरी तालुक्यातील नव्याने बळ देण्यासाठी पक्षनेते सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी लक्ष वेधले आहे. त्यांनी शनिवारी रत्नागिरी तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकार्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. विनायक राऊल शनिवारी रत्नागिरी जिल्हा दौर्यावर आले होते. त्यांनी रत्नागिरी तालुक्यातील नवीन पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र देऊन संघटना मजबुत करण्यासाठी कार्यरत राहण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी केलेल्या नियुक्त्यांमध्ये पावस व गोळप जिल्हा परिषद गटाच्या उपतालुकाप्रमुखपदी सुभाष रघुनाथ पावसकर, हातखंबा व करबुडे जिल्हा परिषद गटाच्या उपतालुकाप्रमुखपदी सुभाष पुंडलिक कर्ला पंचायत समिती गणाच्या उपविभागप्रमुखपदी मिलींद प्रभाकर हातफले यांचा समावेश आहे.
रत्नागिरी: ठाकरे सेनेकडून तालुक्यातील नव्याने नियुक्त केलेल्या पदाधिकार्यांसमवेत माजी खासदार विनायक राऊत. सोबत जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम, शेखर घोसाळे, संजय पुनसकर. रहाटे, करबुडे जिल्हा परिषद गटाच्या विभागप्रमुखपदी चंद्रकांत काशिराम साळवी, कर्ला पंचायत समिती गणाच्या उपविभागप्रमुखपदी मिलिंद प्रभाकर हातफले यांचा समावेश आहे.www.konkantoday.com